Mhada Water Supply Scheme: मीरा रोड, भायंदर, वसई-विरार आणि पालघर येथील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे. वसई-विरार ते मीरा-भाईंदर शहर आणि पालघरमधील अनेक गावांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च-एप्रिल महिन्यापासून या भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यास सुरुवात होईल.