नवनीत राणा यांनी २०१३ मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं. परंतु, नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह यांनी फसवणूक करून जातीचे प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केला. अडसूळ यांनी २०१७ मध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना कार्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले. याच जात प्रमाणपत्राच्या आधारावर नवनीत राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळचा पराभव केला.