किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचली. या सोहळ्याचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर ५ वाजून ३८ मिनिटांनी गरुड मंडपातील चौथरा, ५ वाजून ४८ मिनिटांनी गणपती मंदिरातील जीना, ६ वाजून ०१ मिनिटांनी कासव चौक, ६ वाजून ०४ मिनिटांनी पितळी उंबरठा, ६ वाजून ०५ मिनिटांनी खजिना चौक असे टप्पे पूर्ण करत ६ वाजून १२ मिनिटांनी किरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करुन चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १५ ते १६ मिनिटांपर्यंत किरणे कमरेपर्यंत पोहोचून देवीच्या डाव्या बाजूला लुप्त झाली.