मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सावनेरच्या एका शाळेत शिकणाऱ्या मुलीला घेण्यासाठी अखिल आणि पवन हे दोघेजण आले होते. आरोपी वर्गमैत्रिणीच्या ओळखीचे असल्यानं मुलगी त्यांना भेटण्यास तयार झाली. परंतु शाळेतून मुलीला घेऊन आरोपींनी नागपूर महामार्गाने कार घेत धावत्या कारमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींनी केलेल्या अत्याचारामुळं पीडित मुलगी बेशूद्ध पडल्यानंतर आरोपींनी तिला रस्त्यावरच सोडून दिलं. त्यानंतर रस्त्याच्या किनाऱ्यावर पीडिता बेशूद्धावस्थेत असल्याचं लक्षात आल्यानंतर एका वाहनचालकाला तिला पाणी देत विचारपूस केली. त्यावेळी तिनं घडलेला सारा प्रकार वाहनचालकाला सांगत पोलीस ठाण्यापर्यंत सोडण्याची विनंती केली.