१) माघी गणेशोत्सवासाठी ज्या मंडळाला गेल्या वर्षी परवानग्या देण्यात आल्या आहेत. अशा मंडळांचे अर्ज स्थानिक/वाहतूक पोलिसांकडे न पाठवता मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरुन विभाग कार्यालयांमार्फत छाननी करुन परवानगी देण्यात येणार आहे. परंतु, नव्या पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या मंडळांला परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यांना माघी गणेशोत्सवासासाठी स्थानिक/वाहतूक पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.