मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते तसेच परदेशी पाहुणे देखील यावेळी उसपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. राणे यांनी भाषणादरम्यान औचित्यभंग केल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला, तर राणे यांनी हुज्जत घालत आपले भाषण सुरूच ठेवले.