Beef Smuggling Case In Pune City : उस्मानाबादेत गायींची कत्तल करत त्यांचं मांस मुंबईच्या दिशेनं नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील खडकी परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली असून तब्बल दोन टन गोमांस जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली असून गोमांसची विक्री आणि वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सय्यद सोहेब अजीज, तन्वीर अहमद कुरेशी आणि शौकत हमीद कुरेशी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.