ऋषिकेश गणेश धांडगे (वय १७, रा. गल्ली क्र. ९, गजानननगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ऋषिकेश धांडगे हा लाडगाव येथे अकरावीचे शिक्षण घेत होता. दरम्यान २९ नोव्हेंबररोजी सकाळी ६ वाजता ऋषिकेशचा भाऊ रोहित धांडगे हा कंपनी कामाला जात असतांना ट्रकच्या धडकेत त्याच्या मृत्यू झाला. भावाचा मृत्यू झाल्याने ऋषिकेशला मोठा धक्का बसला. तो नेमही शांत राहायचा. ऋषिकेश आणि रोहितमध्ये मोठे बॉंडिंग होते. ते दोघेही संक्रांतीला पतंग उडवायचे. मात्र, यंदा त्याचा भाऊ नसल्याने त्याच्या मनाला धक्का बसला. भावाचा मृत्यू सहन न झाल्याने त्याने मकरसंक्रांतीच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या करत स्वत:चे जीवन संपवले.