‘सध्याच्या काळात आपण बोलत असताना जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचा, राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करतो. मराठी व इंग्रजीचं जे महत्त्व आहे, त्याबद्दलही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. मराठी ही तर आपली मातृभाषाच आहे. शिवाय जागतिक पातळीवर इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या दोन्ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. हिंदी विषयी बोलाल तर दक्षिणेतील राज्यांची वेगळी भूमिका आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या दक्षिणेतील राज्यांचा हिंदीला विरोध आहे. परंतु महाराष्ट्राचा नागरिक या नात्यानं मला विचारल्यास हिंदी ही राष्ट्रभाषा करायला हरकत नाही, तसा निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.