एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पवई येथील हिरानंदानी परिसरात आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एका १८ वर्षाच्या मोलकरणीने २१व्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच ही आत्महत्या आहे की घातपात आहे, याचाही स्थानिक पोलीस तपास घेत आहेत.