नागपूर – नववर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत असताना राज्यात अनेक छोट्या-मोठ्या अपघातांचे वृत्त येत आहे. जळगावमध्ये एका शाळकरी मुलाचा पंतग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला, तर नागपुरात नायलॉन मांजामुळे एका ११ वर्षीय बालकाचा गळा चिरला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मकरसंक्रांतीच्या दिवशीच एका मुलावर काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.