हिमाचल प्रदेश भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; 3.2 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
Earthquake in Himachal Pradesh : हिमाचल प्रदेश शनिवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. शनिवारी सकाळी ३.२ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाच्या नोंद झाली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून २२ किमी पूर्वेला पहाटे ५.१७ वाजता ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप आला.