मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या दक्षता पथकांनी नागपुरसह विदर्भातील ११ कोटी रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणं उघडकीस आणली होती. याशिवाय वीजचोरीचा दंड न भरलेल्या तब्बल २८८ ग्राहकांवर महावितरणकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तरीदेखील विदर्भातील अनेक भागांमध्ये सातत्यानं वीजचोरी होत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत होत्या. त्यानंतर आता वीजचोरीचे प्रकार रोखण्यासाठी महावितरणकडून खास ऑफर जारी करण्यात आली आहे. त्यामुळं आता वीजचोरीची माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवून त्याला बक्षीस देण्यात येणार आहे.