मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीला आरोपीनं फूस लावून प्रेमात पाडलं. त्यानंतर आरोपी तरुणीच्या इच्छेविरोधात एका कॅफेत घेऊन गेला. तिथं तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. गेल्या वर्षभरापासून आरोपी तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर सातत्यानं बलात्कार करत होता. त्यानंतर तरुणीनं घडलेला सारा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार, पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.