महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तिन्ही वीज कंपन्यातील ३१ कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. कर्मचारी केवळ संप पुकारून थांबले नाहीत तर अनेक ठिकाणी रस्त्यावरही उतरले होते. त्यामुळं हा संप लांबणार अशी शक्यता दिसू लागली होती. मात्र, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कामगार संघटनांचे पदाधिकारी व तिन्ही कंपन्याचे अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सर्वच मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानं कामगार संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. या बैठकीतील निर्णयांचे निवेदन संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले. तीन दिवसांचा संप अर्ध्या दिवसात का मिटला, याच रहस्य याच निवेदनात दडलं आहे.